छावा लभान क्र ांतिवीर सेनेचा हातोडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:23 AM2018-12-22T01:23:05+5:302018-12-22T01:23:20+5:30

सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकरसारख्या यंत्राचा खडी फोडण्यासाठी वापर सुरू केल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे लभान समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

 Chhatrapati Shivaji Terminus Hathoda Front | छावा लभान क्र ांतिवीर सेनेचा हातोडा मोर्चा

छावा लभान क्र ांतिवीर सेनेचा हातोडा मोर्चा

Next

निफाड : सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकरसारख्या यंत्राचा खडी फोडण्यासाठी वापर सुरू केल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे लभान समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.  या बाबींचा शासनाने विचार करावा तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लभान समाजाच्या छावा लभान क्र ांतिवीर सेनेच्या वतीने शुक्र वारी निफाड तहसील कार्यालयावर हातोडा मोर्चा काढण्यात आला. जय जवान, जय लभान अशा घोषणा देत या मोर्चास निफाड मार्केट येथून सुरुवात झाली. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी झालेल्या लभान समाजातील महिला आणि पुरु षांच्या हातात हातोडा होता. मोर्चा बसस्थानकामार्गे तहसीलदार कार्यालय येथे आला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना सादर केले.
लभान समाजाला रोजगार उपलब्ध करून द्यावा, भूमिहीन लोकांना कसण्यासाठी ५ एकर जमीन द्यावी, समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा, २०० ब्रास दगडविना रॉयल्टी मिळावा, जातीच्या दाखल्यासाठी लागणारा १९६१चा पुरावा रद्द करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Web Title:  Chhatrapati Shivaji Terminus Hathoda Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक