छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जाणता राजा’ उपमा अजरामर : सचिन कानिटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:08 IST2019-04-09T01:08:28+5:302019-04-09T01:08:56+5:30
शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जाणता राजा’ उपमा अजरामर : सचिन कानिटकर
पंचवटी : शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे. शिवस्मृतीत रामदासस्वामींनी दिलेल्या उपमा अमर राहिल्या आहेत. त्यातील ‘जाणता राजा’ ही उपमा अजरामर ठरली. समर्थांनी शिवरायांना समर्थ कल्याण म्हटले आहे, असे प्रतिपादन प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.
श्री काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सवानिमित्त वासंतिक नवरात्र महोत्सवात कानेटकर यांनी सोमवारी (दि.८) ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. यावेळी कानिटकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम स्तुती जशी समर्थ रामदासांनी केली तशी स्तुती कविराज भूषण यांनी केली आहे. कविराज भूषण यांनी एक कविता लिहिली त्यात राजांचा उल्लेख केला आणि प्रत्येक राजाला फुलांची उपमा दिली. असेही त्यांनी सांगितले़
यावेळी विश्वस्त मंदार जानोरकर, नगरसेवक शाहू खैरे, गणेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या प्रारंभी मीना परु ळेकर निकम यांनी निश्चयाचा महामेरू शिवस्मृती सादर केली. दैनंदिन कार्यक्र मात रात्री विवेक केळकर, संजय गावकर यांचा गीतरामायण सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवस्मृती म्हणजे आठवण होय त्यातून कोणत्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो देशप्रेम क्षितिजापलीकडचे प्रेम आहे आणि हेच प्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य शिवाजीराजामध्ये होते. शिवरायांनी धनुष्यधारण केले होते. प्रभूरामाने सातासमुद्रापलीकडे जाऊन लंकेवर आक्र मण केले हा प्रताप आहे. जननी आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हिंदू संस्कृती कधीही दुसऱ्यावर आक्र मण करत नाही. रामाने चांगले राज्य तयार केले हे वैशिष्ट्ये आहे. असे ही कानिटकर यांनी सांगितले़