छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 00:08 IST2021-06-27T00:07:16+5:302021-06-27T00:08:14+5:30
ब्राह्मणगाव : येथे ग्रामपंचायत कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त उपस्थित बापू राज खरे, माधव पगार, विनायक खरे, मधुकर खरे,अशोक खरे, अशोक बच्छाव, व ग्रामस्थ.
ब्राह्मणगाव : येथे ग्रामपंचायत कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
उपसरपंच बापुराज खरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्यापणाने साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच बापूराज खरे व माजी उपसरपंच माधव पगार यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली. खरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.
या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते श्यामा माळी, माजी उपसरपंच माधव पगार, राजू परदेशी, माजी उपसरपंच दत्तात्रेय खरे, सामाजिक कार्यकर्ते विनायक खरे, मधुकर खरे,अशोक खरे, अशोक बच्छाव, विजय बच्छाव, काळू जाधव, अशोक जगतात, अतुल खरे, अजय जगताप, राकेश खरे तसेच अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.