छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:24 IST2020-01-16T23:26:49+5:302020-01-17T01:24:40+5:30

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी महाराज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने संभाजी चौक डिंगर अळी येथील पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

Chhatrapati Sambhaji Maharaj celebrated the coronation day | छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दिनेश चव्हाण, अक्षय कहांडळ, अथर्व राऊत, दीपक कहांडळ, अभिषेक कहांडळ आदी.

नाशिक : छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी महाराज प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने संभाजी चौक डिंगर अळी येथील पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय कहांडळ यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात दिनेश चव्हाण यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. तसेच अंकित भडांगे यांनी आभार मानले. यावेळी अथर्व राऊत, दीपक कहांडळ, अभिषेक कहांडळ, अंकित भाडंगे, स्वप्नील कुंभार्डे, ज्ञानेश्वर महाले, सौरभ पवार, भावेश शेवाळे, नवनाथ पोकळे, मच्छिंद्र गोडसे, सुमित गवळी, ललित चव्हाण, विवेक भदाणे, नीलेश हिरे, हर्षल तिडके, कमलेश साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Sambhaji Maharaj celebrated the coronation day