शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:42 IST

भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली

धनंजय वाखारे नाशिक : सातत्याने दुष्काळ पाचवीला पुजलेल्या येवला मतदारसंघाचे गेली तीन टर्म विधानसभेत नेतृत्व करणारे राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची चौथ्यांदा विधानभवनाच्या पायऱ्या चढताना दमछाक होणार आहे.आघाडी सरकारच्या काळात दबदबा असलेल्या भुजबळांचा करिश्मा मात्र यंदा ओसरल्याचे चित्र असून, त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच त्यांचे निकटचे सहकारी माणिकराव शिंदे यांनी जाहीर आव्हान दिले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने या मतदारसंघात शिवसेना इच्छुकांबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली होती. मध्यंतरी भुजबळ हे मतदारसंघ बदलून वैजापूर मतदारसंघातूनही लढण्याची चर्चा सुरू होती.

भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली असून गेल्या महिनाभरापासून त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांसंबंधी घातलेले लक्ष, सुरू केलेले पाहणी दौरे, मांजरपाडा प्रकल्पाबाबत श्रेयवादाची सुरू असलेली लढाई पाहता भुजबळ हेच पुन्हा राष्टÑवादीचे उमेदवार असतील, असे चित्र आहे. भुजबळांनी शिवसेनेची वाट धरली असती तर मतदारसंघात राजकीय समिकरणे बदलली असती. भुजबळ यांच्याविरोधात शिवसेनेत एकापेक्षा एक उमेदवार इच्छुक असून भुजबळांना यंदा कडवी लढत द्यावी लागणार आहे. भुजबळांसमोर स्वपक्षातून उभे राहिलेले आव्हान, गेल्या पाच वर्षात विरोधकांची मजबूत होत गेलेली फळी आणि अ‍ॅण्टी इन्क्बन्सीचा कितपत प्रभाव पडतो यावर छगन भुजबळ यांचे भवितव्य येत्या निवडणुकीत अवलंबून असणार आहे.पाच वर्षांत काय घडले?छगन भुजबळ यांनी मतदारसंघात हॅट्ट्रिक केली; परंतु, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ते तब्बल २६ महिने कारागृहात होते. या काळात कारागृहात राहून त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसंबंधी शासनाशी पत्रव्यवहार केला होता.आघाडीच्या सत्ताकाळात मतदारसंघाचा जो विकास झाला त्याची गती मात्र गेल्या पाच वर्षात मंदावली.२०१७ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातून सत्ता हस्तगत केली. पंचायत समितीत शिवसेनेने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. जिल्हा परिषद निवडणुकीत पाचपैकी तीन जागांवर विजय मिळवत शिवसेनेने वर्चस्व राखले.मतदारसंघातील पाणी, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्न अद्यापही कायम आहेत. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम अद्याप झालेले नाही.बंधाऱ्यांची कामे रखडलेली आहेत. तालुक्यात पावसाळ्यातही पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. विकासाचा अनुशेष अजूनही भरलेला नाही. - संभाजी पवार, पराभूत उमेदवार, शिवसेना

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळyevla-acयवेलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019