कळवण : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे. या घटनेचा कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस, कळवण तालुका महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने धमकी देणाºयांना तात्काळ अटक करीत कठोर कारवाई करावी याबाबत कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण हिरे, आदिवासी सेवक पांडुरंग पाटील, राजेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस, महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, वसाकाचे माजी संचालक कृष्णा पाटील बच्छाव, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप पगार, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ मोकभणगीचे उपसरपंच संजय शेवाळे, सागर खैरनार, भूषण देशमुख, उमेश सोनवणे आदींसह भुजबळ समर्थक उपस्थित होते.
छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:12 IST
कळवण : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे. या घटनेचा कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस, कळवण तालुका महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने धमकी देणाºयांना तात्काळ अटक करीत कठोर कारवाई करावी याबाबत कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना निवेदन देण्यात आले.
छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्यांना अटक करा
ठळक मुद्दे कळवण : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन; कार्यकर्त्यांकडून निषेध