सेना भवन फोडण्याच्या लाड यांच्या विधानानंतर छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा झाले, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 16:12 IST2021-08-01T16:11:50+5:302021-08-01T16:12:30+5:30
Chhagan Bhujbal: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं विधान करणाऱ्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक आणि नेत्यांकडून जोरदार टीका सुरू आहे.

सेना भवन फोडण्याच्या लाड यांच्या विधानानंतर छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा झाले, म्हणाले....
Chhagan Bhujbal: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं विधान करणाऱ्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक आणि नेत्यांकडून जोरदार टीका सुरू आहे. यातच मूळचे शिवसैनिक असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही लाड यांच्या विधानावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांना प्रसाद लाड यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता त्यांच्यातील शिवसैनिक जागा झाला आणि त्यांनी फक्त एका वाक्यातच लाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
"कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते", असा मिश्लिक टोला छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांना लगावला. छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांचं विधान गांभीर्यानं घेतलं नाही आणि अनुल्लेखानंच प्रत्युत्तर दिलं.
राऊतांनीही दिलं जशास तसं प्रत्युत्तर
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही प्रसाद लाड यांच्या विधानावर बोलताना त्यांनी जास्त काही न बोलता या प्रकरणावर आमचे शाखाप्रमुख बोलतील, एवढचं म्हणत प्रसाद लाड यांच्या विधानाची हवाच काढली.
दादरमधील भाजपा कार्यालयाच्या उदघाटनावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून प्रसाद लाड यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. प्रसाद लाड यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ प्रकाशित करुन आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत हात झाडण्याचा प्रयत्न केला.