शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची"; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, "एकत्र असून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:35 IST

Chhagan Bhujbal VS Suhas Kande : शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Yevla Assembly constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली.  त्यानंतर नांदगावचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी थेट छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यावेळी सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत भुजबळ यांनी अपक्ष उमेदवरी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर विद्यमान आमदार सुहास कांदे आणि भुजबळ यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. येवला मतदारसंघात निवडणूक लढण्याची घोषणा करत सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी अद्यापही सुरू आहे. ही याचिका भुजबळ यांच्यासाठी अडचणीची आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मिळालेली क्लीन चिट चुकीची आहे, असं सुहास कांदे यांनी म्हटलं

सुहास कांदेंनी केलेल्या आरोपांना आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "सुहास कांदेंच्या म्हणण्याला आम्ही कोर्टात उत्तर देऊ. मला काहीही नोटीस आलेली नाही. त्यांनीच आता कबुल केले की खटल्यातून सुटल्यानंतर ते वारंवार अपिल करत आहेत. महायुतीमध्ये  आम्ही एकत्र आहोत तरी आमच्या विरोधात जाण्याचे कारण नाही. ते काय एका दिवसात आमच्या विरोधात गेलेले नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

भुजबळांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचेच हा माझा संकल्प - सुहास कांदे 

"भुजबळांवरील याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती. मला पैशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. मात्र, मी त्याला बदलणार नाही. या धमक्यांनंतरही मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही,भविष्यातही घेणार नाही. त्यामुळेच भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत, हा राग काढण्यासाठीच त्यांनी माझ्यावर विविध आरोप केले. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी शिक्षा म्हणून मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचेच हा माझा संकल्प आहे. त्यापासून मला कोणीही विचलित करू शकणार नाही," असंही सुहास कांदे म्हणाले होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकyevla-acयेवलाChhagan Bhujbalछगन भुजबळ