नागापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी छबू सोमासे
By Admin | Updated: March 7, 2017 00:20 IST2017-03-07T00:20:40+5:302017-03-07T00:20:53+5:30
नमाड : नागापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपाचे छबू सोमासे यांची, तर उपाध्यक्षपदी गोरख कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नागापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी छबू सोमासे
मनमाड : नागापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपाचे छबू सोमासे यांची, तर उपाध्यक्षपदी गोरख कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुकांमुळे गावातील राजकीय हेवेदावे वाढत असल्याची बाब हेरून गावाची शांततेच्या मार्गाने विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सोसायटीची निवडणूक बिनविरोध घडवून आणण्याचा मानस माजी आमदार संजय पवार यांनी ग्रमास्थांजवळ व्यक्त केला होता. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार, कृउबा उपसभापती अशोक पवार व माजी सभापती राजेंद्र पवार यांनी प्रयत्न केल्याने सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोसायटी सदस्य सुधाबाबा पवार, रामभाऊ पवार, रघुनाथ सोमासे, माधव पवार, भीमराज, कुनगर, आशाबाई शिलावट उपस्थित होते. (वार्ताहर)