शेवगेडांग : ग्रामपंचायतीच्याउपसरपंच निवडीसाठी नविनर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी उपसरपंच म्हणून कमल विष्णू पोरजे यांची निवड झाली.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पोरजे नेतृत्वाखाली थेट सरपंच पदासह सर्व ग्रामपंचायत सदस्य निवडणूक बिनविरोध करण्यात झाली होती. त्यामुळे उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले होते. सरपंच साहेबराव सोमा खंडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंच पदासाठी कमल विष्णू पोरजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य भीमराव चहाळे, काशीनाथ मांगटे, संदीप भरीत, हिराबाई भस्मे, सुनीता चहाळे, शोभा पोरजे, लिलाबाई भरीत, लता भरीत, ग्रामसेवक सुंदर म्हसाळ उपस्थित होते. आमदार निर्मला गावित, प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, बाजार समतिी उपसभापती गोरख बोडके यांनी अभिनंदन केले आहे.
शेवगेडांग उपसरपंचपदी कमल पोरजे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 20:48 IST
शेवगेडांग : ग्रामपंचायतीच्याउपसरपंच निवडीसाठी नविनर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी उपसरपंच म्हणून कमल विष्णू पोरजे यांची निवड झाली.
शेवगेडांग उपसरपंचपदी कमल पोरजे बिनविरोध
ठळक मुद्दे निवडणूक बिनविरोध करण्यात झाली