आयोलाल झुलेलालच्या जयघोषात चेट्रीचंड्र मिरवणूक
By Admin | Updated: March 30, 2017 00:45 IST2017-03-30T00:45:25+5:302017-03-30T00:45:38+5:30
नाशिक : सिंधी बांधवांचे नवीन वर्ष आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधी समाज चेट्रीचंड्र उत्सव समितीतर्फे बुधवारी (दि. २९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आयोलाल झुलेलालच्या जयघोषात चेट्रीचंड्र मिरवणूक
नाशिक : सिंधी बांधवांचे नवीन वर्ष आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधी समाज चेट्रीचंड्र उत्सव समितीतर्फे बुधवारी (दि. २९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चेट्रीचंड्र जयंतीनिमित्त सारडा सर्कल येथील लोखंड बाजार येथून बाइक रॅली काढण्यात आली. फळ बाजार, शालिमार, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड यामार्गाने निघालेल्या बाइक रॅलीची होलाराम कॉलनी येथे सांगता करण्यात आली. शालिमार चौकातून मिरवणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
चेट्रीचंड्र उत्सवानिमित्त शालिमार येथील भगवान झुलेलाल मंदिरात पारंपरिक पद्धतीने विजय सेतपाल महाराज, सूरज सेतपाल महाराज आणि सुनील शर्मा महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चित्ररथाचादेखील समावेश करण्यात आला होता. दुपारी शालिमार येथून निधालेली मिरवणूक शिवाजीरोड, मेनरोड, रविवार कारंजा आणि मालेगाव स्टॅण्ड मार्गे रामकुंड परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. चेट्रीचंड्र ही वरुण देवता असल्याने यावर्षी सर्वत्र दमदार पाऊस व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. चेट्रीचंड्र महोत्सवात किशन अडवाणी, नानीकराम मदनानी, अशोक पंजाबी, राजू पंजाबी, जगदीश नंदवानी, श्याम पंजाबी, मुकेश वालेचा, हलपाल चेतवानी, मनीष तोलनी, जितू खेमानी, बिंदू खुबानी, कुणाल अजवाणी, दीपक पंजाबी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला शोभायात्रा
नाशिकरोड परिसरात भगवान श्री झुलेलाल जयंती व सिंधी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. सकाळी जेलरोड कलानगर येथील भगवान श्री झुलेलाल मंदिरात सकाळी सुरेश सुंदराणी, किशोर कारडा, लक्ष्मण कारडा यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. दुपारी दिमा भगवान यांचा सत्संग, भजन व सिंधी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. युवकांनी नाशिकरोड भागातून भगवान श्री झुलेलाल की जय अशा घोषणा देत मोटारसायकल रॅली काढली होती. कलानगर येथील मंदिरापासून वाहनात भगवान श्री झुलेलाल यांच्या प्रतिमेची जेलरोड, बिटको, शिवाजी पुतळा, वास्को चौक मार्गे शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी राजन दलवाणी, नरेश कारडा, मनुशेठ जयसिंघानी, शंकर देवाणी, अशोक केसवाणी, दिलीप दासवाणी, नरेश गाराणी, गिरीश रामनाणी, भगवान कारडा, सोनू वेन्सानिया, वाल्मीक बागुल, दीपक वाणी, सुरेश आमेसर, दीपक देवाणी, दीपेश लखनानी आदि सहभागी झाले होते.