नाशिक : सिडकोतील पवननगरच्या अक्षयचौक परिसरात राहणाºया संतोश दशरथ बटाव यांना दोन ठगबाजांनी बनावट सोनसाखळीची ८० हजार रुपयांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन फसवणूक करणाºया संशयिताचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील पवननगर येथील संतोश बटाव यांच्यासोबत दोन अनोळखी व्यक्तींनी ओळख निर्माण करून विश्वास संपादन करून फसवणू केल्याचा प्रकार घडाला. दोन्ही संशयितांनी जुन्या इमारतीचा पाया खोदताना त्यात सोने सापडल्याची बतावणी करीत त्यांच्याकडून सोनसाखळीतील दोन कड्या काढून बटाव यांना ते सोनेच आहे किवा नाही याची पडताळणी करण्यास सांगितले. बटाव यांनी दोन्ही कड्यांची पडताळणी केली असता के सोनेच असल्याची त्यांची खात्री पटली.त्यावर संशयिताने सोने तुम्हीच घ्या आणि आम्हाला आठ लाख रुपये द्या असे सांगून शुक्रवारी (दि.१० ) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दोन्ही संशयितांना बटाव यांना द्वारका चौकातील भूयारी मार्गात बोलावून ८० हजार रुपये रोख घेत बनावट सोनसाखळी देऊन फूसवणूक केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला असून सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
जुन्या इमारतीचा पाया खोदताना सोने सापडल्याची बतावणी करून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:17 IST
सिडकोतील पवननगरच्या अक्षयचौक परिसरात राहणाºया संतोश दशरथ बटाव यांना दोन ठगबाजांनी बनावट सोनसाखळीची ८० हजार रुपयांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन फसवणूक करणाºया संशयिताचा पोलीस शोध घेत आहे.
जुन्या इमारतीचा पाया खोदताना सोने सापडल्याची बतावणी करून फसवणूक
ठळक मुद्देबनावट सोनसाखळीची 80 हजार रुपयांना विक्री दोन ठगबाजांनी केली संतोश बटाव यांची फसवणूक जुन्या इमारतीचा पाया खोदताना सोने सापडल्याची बतावणी