डेबिट कार्डची माहिती घेऊन केली फसवणूक

By Admin | Updated: August 5, 2014 01:46 IST2014-08-05T01:45:34+5:302014-08-05T01:46:22+5:30

डेबिट कार्डची माहिती घेऊन केली फसवणूक

Cheating with information about the debit card | डेबिट कार्डची माहिती घेऊन केली फसवणूक

डेबिट कार्डची माहिती घेऊन केली फसवणूक

 

नाशिक : चेहडी परिसरातील नागरिकाच्या बँकेच्या खाते क्रमाकांवरून डेबिट कार्ड, तसेच वैयक्तिक माहिती घेऊन एकाने चाळीस हजारांची खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात राजेश शर्मा नावाच्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चेहडी परिसरातील उज्ज्वल कॉलनीत राहणारे रामकृष्ण बळवंत जाधव (४०) यांना २१ एप्रिलला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राजेश शर्मा नावाच्या व्यक्तीने ०९६८१०२३७७३ या भ्रमणध्वनीवरून फ ोन केला़ यावेळी शर्मा याने जाधव यांच्या बँकेच्या खाते क्रमांकावरून डेबिट कार्ड, तसेच वैयक्तिक माहिती घेतली़ यानंतर शर्माने जाधव यांच्या बँक खात्यावरील रकमेचा उपयोग करून ३९ हजार ५१० रुपयांची खरेदी करून फ सवणूक केली़
या प्रकरणी जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, राजेश शर्माविरोधात आयटी अ‍ॅक्टन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Cheating with information about the debit card