शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ओझरच्या तरुणाची पाच लाख घेऊन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:01 IST

ओएलएक्स अ‍ॅपवर इनोव्हा कार विक्र ीची जाहिरात देऊन ओझर येथील एकास विश्वासात घेऊन त्याच्यासह त्याच्या नातेवाइकाकडून ४ लाख ८६ हजार  रु पये बँक खात्याच्या माध्यमातून घेऊन कारची विक्र ी न करता फसवणूक केली असल्याची तक्र ार ओझर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

ओझर टाउनशिप : ओएलएक्स अ‍ॅपवर इनोव्हा कार विक्र ीची जाहिरात देऊन ओझर येथील एकास विश्वासात घेऊन त्याच्यासह त्याच्या नातेवाइकाकडून ४ लाख ८६ हजार  रु पये बँक खात्याच्या माध्यमातून घेऊन कारची विक्र ी न करता फसवणूक केली असल्याची तक्र ार ओझर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.  रोशन राजेद्र शेवाळे (रा. संघराज्य हाउस आर. के. मेमोरियल हॉस्पिटलजवळ, ओझर) यांनी ओझर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की, १० जुलै रोजी मी ओएलएक्स अ‍ॅपवर जुनी इनोव्हा कार खरेदीसाठी शोधत असताना एमएच १२ एचएन ७८६८ ही कार विक्र ीसाठी असून, कारचा मालक किशोर कुमार असल्याचे समजले. मी कारबाबत त्याच्याशी बोलणी केली असता त्याने मला सांगितले की कार माझ्या मालकीची असून, गेल्या चार महिन्यांपासून लोहगाव विमानतळावर व्हीआयपी पार्किंगमध्ये लावलेली आहे. मी सध्या दिल्लीला असल्याने मला कार विकावयाची आहे. पार्किंगचे बील भरावयाचे आहे म्हणून मी कार पाच लाख रुपयापर्यंत विकेल, असे किशोर याने सांगितले. तेव्हा कारबाबत आमचा व्यवहार ठरला व किशोर कुमार याने लोहगाव विमानतळ व्यवस्थापक महेश कुमार यांच्याशी संपर्ककरून त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितल्याप्रमाणे महेश कुमार यांच्याशी मी चर्चा केली. त्याने कारचे पैसे पहिले भरावे लागतील कार न आवडल्यास पैसे परत मिळतील असे सांगितले. परंतु पैसे परत हवे असतील तर ते आमचे जनरल मॅनेजर (विमानतळ) अमितकुमार तिवारी यांच्या खात्यावर जमा करावे लागतील असे सांगितले. मी १२ जुलै रोजी माझ्या बँक खात्यातून तीन लाख ८६ हजार रुपये तिवारी यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले.  त्यांनी मला इनोव्हा कार न देता माझ्यासह शालकाकडून घेतलेली रक्कमही परत केले नाही. वरील तिघांनी (त्यांचा पूर्ण पत्ता माहीत नाही) माझी ४ लाख ८६ रु पयांची फसवणूक केली आहे. शेवाळे यांनी शुक्र वारी तक्रार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी वरील तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.संशय आल्यामुळे पैसे परत मागितलेमी लोहगाव विमानतळावर कार घेण्यासाठी गेलो असता मला सांगण्यात आले की कारची दंडाची आणखी रक्कम भरल्याशिवाय कार तुम्हाला देता येणार नाही. १३ तारखेस माझ्या शालकाने त्याच्या खात्यामधून एक लाख रुपये तिवारी यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले. नंतर मी कार घेण्यासाठी गेलो परंतु कोणीही तेथे कार घेऊन आले नाही. म्हणून मी त्यांना फोन केला तेव्हा मला परत पैसे भरावे लागतील तरच कार मिळेल असे सांगितले. मला संशय आल्यामुळे मी पैसे परत मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असे शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा