भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज झाले स्वस्त !

By Admin | Updated: March 28, 2017 01:15 IST2017-03-28T01:15:13+5:302017-03-28T01:15:28+5:30

नाशिक : उन्हाळ्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे थंडगार लालचुटूक भरपूर गर असलेल्या कलिंगड तथा टरबूजाची पेठरोडवरील शरदचंद्र पवार मध्यवर्ती बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.

Cheap and easy to grow in the melon! | भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज झाले स्वस्त !

भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज झाले स्वस्त !

नाशिक : उन्हाळ्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे थंडगार लालचुटूक भरपूर गर असलेल्या कलिंगड तथा टरबूजाची पेठरोडवरील शरदचंद्र पवार मध्यवर्ती बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. बाजार समितीत रोज अकराशे ते बाराशे क्विंटल टरबुजाची आवक होत आहे. मागील आठवड्यात सरासरी ५०० ते ७०० क्विंटल आवक झाली. असून, भाव ९०० रुपये क्विंटल असा आहे. तर किरकोळ विक्रीचा भाव सात ते आठ रुपये किलो असून, एक नगाचे वजन दीड किलोपासून ते १२ किलोपर्यंत असते. त्यामुळे एक टरबूज ग्राहकाला दहा पंधरा रुपयांपासून ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळते, असे बाजार समितीतील द्वारकानाथ शिंदे यांनी सांगितले.
साधारणत: उन्हाळ्याच्या प्रारंभी या फळाची आवक सुरू होते अन् पावसाळा येईपर्यंत ती सुरूच राहते. यंदा मात्र जानेवारीच्या प्रारंभीच या फळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. नाशिक बाजार समितीत रोज ५०० ते ७०० क्विंटल आवक होते. परंतु यंदा पावसाळा चांगला झाल्याने नदीकाठावर आणि शेतात पिकणाऱ्या या फळाचे भरघोस उत्पन्न झाले आहे. त्यामुळे आवक दुप्पट झाली आहे.
औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव, रायपूर आदि ठिकाणांहून नाशिक बाजार समितीत टरबुजांचे ट्रक भरून येतात. तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यात या मालाचा खप होतो. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जव्हार, मोखाडा, संगमनेर, सिन्नर, पेठ येथे या मालाची निर्यात होते. टरबुजाची आवक वाढल्याने ठोक विक्रीचे भाव कोसळले तर किरकोळ विक्रीचे भाव मात्र चढेच आहेत, असे काही ग्राहकांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Cheap and easy to grow in the melon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.