सातबारा दुरुस्तीसाठी चावडी वाचन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:16+5:302021-06-26T04:11:16+5:30
ई फेरफार प्रणालीमध्ये राज्यातील शंभर टक्के अधिकार अभिलेखाचे संणकीकरण झाले असून, या संगणकीकृत सात-बाराच्या आधारे दस्त नोंदणी केली जाते. ...

सातबारा दुरुस्तीसाठी चावडी वाचन उपक्रम
ई फेरफार प्रणालीमध्ये राज्यातील शंभर टक्के अधिकार अभिलेखाचे संणकीकरण झाले असून, या संगणकीकृत सात-बाराच्या आधारे दस्त नोंदणी केली जाते. यामध्ये अचूकता येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तथापि संगणकीकृत सातबारामध्ये चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदने अथवा तक्रारी प्राप्त होतच असतात, अशा तक्रारींचे निरसन होण्यासाठी तसेच चुका दुरुस्तीसाठी येवला तालुक्यात संगणकीकृत व हस्तलिखीत सातबाराचे वाचन करावे व त्यात आढळलेल्या तफावतीबाबत कोणत्या कलमाखाली कार्यवाही करावी, त्याबाबत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले असल्याचे तहसीलदार हिले यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व महसुली गावांमध्ये ३० पर्यंत चावडी वाचन आयोजित करण्यात आले आहे. या चावडी वाचन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपले संगणकीकृत सात-बारा अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.