चव्हाण - सोनवणे यांची कसोटी

By Admin | Updated: February 17, 2017 00:15 IST2017-02-17T00:15:02+5:302017-02-17T00:15:35+5:30

चव्हाण - सोनवणे यांची कसोटी

Chavan - Sonawane's Test | चव्हाण - सोनवणे यांची कसोटी

चव्हाण - सोनवणे यांची कसोटी

 महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० मधील सर्वसाधारण गटात भाजपाचे सतीश सोनवणे आणि अपक्ष पण शिवसेना पुरस्कृत उमेदवार संजय चव्हाण यांच्यात काट्याची लढत होत आहे. सतीश सोनवणे हे मागील निवडणुकीत राज ठाकरे यांच्या लाटेवर स्वार होत निवडून आले. परंत, पक्षाकडून कामे होत नसल्याची तक्रार करत सोनवणे यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. संजय चव्हाण यांनी मागील निवडणुकीत जुने नाशिक भागातील मूळ प्रभागात राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत वडाळा भागातील परिसरातील प्रभागात अपक्ष उमेदवारी केली आणि निवडून आले. आता प्रभागाची मोठी व्याप्ती आणि नव्याने जोडला गेलेला भाग यामुळे दोहोंसाठी मतदारांपुढे सामोरे जाण्याचे मोठे आव्हान आहे. सोनवणे यांना वडाळा गावठाण भाग नवा, तर संजय चव्हाण यांना इंदिरानगर परिसरातील भाग नवा, त्यामुळे चुरशीचा सामना बघायला मिळणार आहे. संजय चव्हाण यांच्याबाबतीत एबी फॉर्मचा घोळ झाल्याने त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असले तरी अपक्ष म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा मतदारांसमोर जावे लागत आहे.

Web Title: Chavan - Sonawane's Test