शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सेना वाटेवरील चव्हाण दाम्पत्य फिरले माघारी

By श्याम बागुल | Updated: September 16, 2019 20:05 IST

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे भाजपात, तर दीपिका चव्हाण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असल्यामुळे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पवार यांनी दिवसभरात पंधराही

ठळक मुद्देशरद पवारांकडून आढावा : राष्टÑवादीच्या इच्छुकांची चाचपणीयेवल्यातून भुजबळ यांच्या ऐवजी अन्य एका इच्छुकांनी इच्छा प्रदर्शित केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राज्यस्तरीय दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून केली. पंधरा विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व निवडणूक इच्छुकांकडून राजकीय समीकरणे व निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना सर्वांना एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण व त्यांचे पती संजय चव्हाण हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याबाबत होत असलेल्या चर्चेचे तथ्य काय अशी विचारणा शरद पवार यांनीच केल्याने चव्हाण दाम्पत्यांनी आपण राष्टÑवादीतच असल्याचा खुलासा केला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे भाजपात, तर दीपिका चव्हाण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असल्यामुळे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पवार यांनी दिवसभरात पंधराही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. बागलाण मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना पवार यांनी राजकीय परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी काही पदाधिका-यांनी राष्टÑवादीच्या आमदार दीपिका चव्हाण या सेनेच्या वाटेवर असल्याची मतदारसंघात चर्चा होत असून, तसे वृत्त प्रसिद्धही झाले आहे. त्यामुळे तसे होणार असेल तर त्यांनी अगोदर स्पष्ट करावे, अशी मागणी केली. त्यावर पवार यांनी चव्हाण दाम्पत्याला विचारणा करून काय असेल ते स्पष्ट करा, अन्यथा मतदारसंघात अन्य इच्छुक तयार असल्याचे सांगितले. त्यावर दीपिका चव्हाण यांनी सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगून आपण राष्टÑवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. दिंडोरीचे नरहरी झिरवाळ यांनीही दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीला हजेरी लावली. त्यांच्याबाबतही होणा-या चर्चेला पूर्ण विराम देण्यात आला. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांचा आढावा घेताना नांदगावमधून एकमेव, तर येवल्यातून भुजबळ यांच्या ऐवजी अन्य एका इच्छुकांनी इच्छा प्रदर्शित केली.तब्बल दहा तासांहून अधिक वेळ चाललेल्या या आढावा बैठकीत शरद पवार यांनी मतदारसंघातून निवडून येण्यासाठी युवक, महिला आघाडीची तयारी काय? निवडणुकीला सामोरे जाण्यास कोण कोण तयार आहे, उमेदवारी न मिळाल्यास काय भूमिका राहील याची विचारणा केली. त्याचबरोबर पक्षात चांगले-वाईट दिवस येत असतात त्यामुळे मनोधैर्य खच्चीकरण होऊ देऊनका. जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात संताप असून, त्याचा फायदा उचला, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, मंदी, शेतमालाला भाव आदी विषय घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.चौकट====

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक