शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चपळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:14 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी न्या. चपळगावकर यांना सूत्रे प्रदान करीत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी न्या. चपळगावकर यांना सूत्रे प्रदान करीत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.रविवारी सकाळी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत न्या. चपळगावकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये न्या. चपळगावकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष न्या. चपळगावकर यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाचा वारसा खूप समृद्ध असून, त्या परंपरेत स्थान मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. प्रतिष्ठानची कार्यकक्षा विस्तारित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. अजून कोणत्या प्रकारचे कार्य करता येईल, त्याबाबतदेखील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक विद्वान व्यक्तींचे ज्ञान, त्यांच्याजवळील विपुल भांडार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत कसे पोहोचवता येईल, त्याबाबतदेखील विचार केला जाणार असल्याचे न्या. चपळगावकर यांनी सांगितले.मूल्य जपण्याची ताकदकुसुमाग्रज प्रतिष्ठान हे सत्ताधीश किंवा राजकारण्यांची मदत घेऊनही कधी त्यांच्या कह्णात गेले नाही. ही तारेवरची कसरत येथील पदाधिकाऱ्यांनी जमवून दाखवली आहे. मात्र, सरकारवरच अवलंबून राहिलो तर कार्याचा दर्जा हळूहळू घसरत जातो. तसे होऊ नये, ही दक्षतादेखील घ्यावी लागेल. तसेच कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेली समता, स्वायत्तता आणि बंधुता ही आपली मूल्य जपण्याची ताकद आपल्यात असल्याचेही न्या. चपळगावकर यांनी नमूद केले.चाकोरीबाहेरील कार्यकोणत्याही शासनाला काम करायचे असल्यास चाकोरीतच करावे लागते. त्यापेक्षा काही वेगळे भरीव कार्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा असल्याचे न्या. चपळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वायत्ततेचा लाभ घेत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यभरात कार्य करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. मराठी माध्यमातील आणि मातृभाषेतून बोलणारे अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे मुलांना मराठी माध्यमांसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी शासनाने मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांची निर्मिती करून त्या आदर्श पद्धतीने चालवल्या तर मराठी शाळांकडील कल वाढून मराठीला चालना मिळू शकेल, असे मतदेखील न्या. चपळगावकर यांनी केले. त्याशिवाय शासनाने अन्य भाषांशी आपले आदान-प्रदान चांगले व्हावे, यासाठी अनुवादाचा स्वतंत्र विभाग निर्माण करायला हवा, अशी अपेक्षादेखील न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजliteratureसाहित्य