चापडगाव शिवारात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:53 IST2019-06-04T15:52:56+5:302019-06-04T15:53:16+5:30
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली.

चापडगाव शिवारात बिबट्या जेरबंद
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भाग असलेल्या चापडगाव शिवारात बिबट्याचा वावर होता. अनेकदा बिबट्याने दिवसा दर्शन दिल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे शेतक-यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी सरपंच दत्तोपंत सांगळे यांच्या वस्तीलगत शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. सोमवारी रात्री पिंजरा लावून कर्मचारी गेले होते. मंगळवारी पहाटे बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज येऊ लागल्याने शेतकºयांनी जावून पाहिल्यानंतर बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याचे निदर्शनास आली. सरपंच सांगळे यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना घटनेची माहिती दिली. मंगळवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे यांच्यासह वनरक्षक के. आर. ईरकर, टी. ई. भुजबळ, वसंत आव्हाड, जगन जाधव, तुकाराम मेंगाळ, भगवान जाधव, रामनाथ आगिवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी मोहदरी वनउद्यानात करण्यात आली.