तिरंग्याने न्हाऊन निघाला चणकापूर धरणातील विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 14:11 IST2023-08-15T14:10:53+5:302023-08-15T14:11:16+5:30
देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील चणकापूर धरणावर तिरंग्याची विद्दुत रोषणाई लक्षवेधी ठरली आहे.

तिरंग्याने न्हाऊन निघाला चणकापूर धरणातील विसर्ग
मनोज देवरे, नाशिक : देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील चणकापूर धरणावर तिरंग्याची विद्दुत रोषणाई लक्षवेधी ठरली आहे.
चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यावेळी पाण्याच्या विसर्गाबरोबरच विद्युत रोषणाईही करण्यात आली. तिरंग्याच्या रंगांनी केलेली ही विद्युत रोषणाई विसर्गामुळे अधिक लक्षवेधी ठरत आहे.
कळवण तालुक्यातील चणकापूर धरण प्रशासकीय यंत्रणेने उपविभागीय जलसंपदा अधिकारी इंजि.सुधीर पगार यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनानिमित्त ही अनोखी सलामी दिली आहे. धरणाच्या पाण्यावरील हे विद्युत रोषणाईच्या तिरंग्याचे दृष्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांना हे दृश्य आपल्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरता आला नाही.