साधुग्रामकडील वाहतूक मार्गात बदल
By Admin | Updated: August 17, 2015 23:44 IST2015-08-17T23:43:45+5:302015-08-17T23:44:14+5:30
उद्या ध्वजारोहण : आज रात्री ८ वाजेपासून अंमलबजावणी

साधुग्रामकडील वाहतूक मार्गात बदल
नाशिक : तपोवनातील साधुग्राममधील आखाड्यांचे बुधवारी (दि़१९) रोजी ध्वजारोहण होणार आहे़ यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित शाह, पालकमंत्री गिरीश महाजन आदिंसह विविध पक्षांतील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे़ ध्वजारोहणाच्या वेळी साधुग्रामसह परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी साधुग्रामकडे येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल केले असून, मंगळवारी (दि़१८) रात्री ८ वाजेपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वाहतूक व्यवस्थेतील बदल हा साधुग्राममधील आखाड्यांचा ध्वजारोहण कार्यक्रम होईपर्यंत असणार आहे़ यानंतर म्हणजेच साधारणत: दुपारनंतर हे मार्ग पुन्हा पूर्ववत सुरू केले जाणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्तप्रशांत वाघुंडे यांनी सांगितले़पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व साधू-महंतांची वाहनांना यातून वगळण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)