श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

By Admin | Updated: August 7, 2014 01:41 IST2014-08-07T01:23:06+5:302014-08-07T01:41:51+5:30

श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

Changes to the traffic route on Shravani Monday | श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

 

नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते़ यासाठी जिल्हाभरातून भाविक त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळा स्टॅण्डवर मोठी गर्दी करतात़ सीबीएस परिसरात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयाने येत्या रविवारी (दि़ १०) दुपारी २ पासून ते सोमवारी (दि़ ११) रात्री ८ वाजेपर्यंत सीबीएस परिसरातील मेळा स्टॅण्ड येथून जाणाऱ्या शरणपूररोडवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत़
सीबीएस चौकातून शरणपूररोडने टिळकवाडी चौफु लीपर्यंत जाणाऱ्या रोडवर एस़टी़ बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळून इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे़ सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नलकडे जाणारी वाहने सीबीएस चौकातून मोडक सिग्नल, हॉटेल राजदूतमार्गे किंवा सीबीएस सिग्नल येथून मेहेर सिग्नल, अशोकस्तंभमार्गे गंगापूररोडने पुढे इतरत्र जातील़
शरणपूररोडवरील टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे जाण्यास एस़टी़ बसेस व शहर वाहतूक बसेस वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे़ टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएसकडे जाणारी वाहतूक ही टिळकवाडी सिग्नल, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नलवरून सीबीएसकडे जातील किंवा टिळकवाडी सिग्नलवरून पंडित कॉलनीमार्गे गंगापूररोडने अशोकस्तंभमार्गे पुढे इतरत्र जातील़
हॉटेल राजदूत चौफु लीकडून शरणपूररोड मेळा स्टॅण्डपावेतोचा मार्ग हा सर्व एसटी बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत असून, सदरचा मार्ग हा फ क्त मेळा स्टॅण्ड ते हॉटेल राजदूत असा एकेरी वाहतुकीसाठी खुला असणार आहे़ हे निर्बध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागू राहणार नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Changes to the traffic route on Shravani Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.