शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

By admin | Updated: October 11, 2015 23:28 IST

नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत कालिकामाता आणि भगूर येथील रेणुकामाता यात्रोत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सकाळी पाच ते दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे़ या अधिसूचनेनुसार कालिकादेवी नवरात्रोत्सव कालावधीत मोडक चौक सिग्नल ते संदीप हॉटेल कॉर्नर, मनपा आयुक्त निवासस्थान ते भूजल सर्वेक्षण कार्यालय, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेल या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १३ ते २२ आॅक्टोबर २०१५ या दरम्यान पहाटे पाच ते सकाळी दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बंद केली जाणार आहे़ या कालावधीत एस़टी़ बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही मोडक चौक सिग्नलहून खडकाळी सिग्नलमार्गे साठ फुटीरोड, द्वारका सर्कल या मार्गाने नाशिकरोड व सिडकोकडे जातील़ तसेच मुंबई नाक्यावरून शहरात येणारी हलकी वाहने ही महामार्ग बसस्थानक, टॅक्सी स्टॅण्ड, तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरूमसमोरून चांडक सर्कल, भवानी सर्कल या मार्गाने त्र्यंबकरोडने शहरात येतील़ नाशिक शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारी जड वाहने ही द्वारका सर्कलवरून गरवारे टी या मार्गाने, तर द्वारका सर्कलवरून पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी स्कूल यामार्गे पंचवटीत जातील़ सारडा सर्कलकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने ही एऩ डी़ पटेलरोड, किटकॅट चौफु ली या मार्गाने मोडक सिग्नलमार्गे जातील़ भगूर येथील रेणुकादेवी मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेस्ट कॅम्परोड हा केंद्रीय विद्यालय, जोजीला मार्ग, जोशी हॉस्पिटल हा मार्ग पहाटे पाच ते सकाळी अकरा आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे़ या कालावधीत भगूर गावाकडून देवळाली कॅम्पकडे जाणाऱ्या एस़टी़ बसेस, रिक्षा व इतर सर्व प्रकारची वाहने ही केंद्रीय विद्यालयासमोरून जोजीला मार्ग, जिजामाता चौक, पेरूमल रोड या मार्गाने जातील व देवळाली कॅम्पकडून भगूरकडे श्रीयश आर्केड (जोशी हॉस्पिटल), पेरूमल रोड, जिजामाता चौक, जोजीला मार्ग, केंद्रीय विद्यालय, भगूर या मार्गे जातील. यात्रोत्सव कालावधीत करण्यात आलेल्या बदलांची नागरिकांनी दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)