वाहतूक मार्गात बदल

By Admin | Updated: September 1, 2014 01:24 IST2014-09-01T00:57:53+5:302014-09-01T01:24:41+5:30

वाहतूक मार्गात बदल

Changes in the traffic route | वाहतूक मार्गात बदल

वाहतूक मार्गात बदल

नाशिक : गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे़ या अधिसूचनेनुसार सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे़ या अधिसूचनेचे नागरिकांनी पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या दरम्यानचा दोन्ही बाजूकडील मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे़

Web Title: Changes in the traffic route