लोकसभा मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
By Admin | Updated: May 14, 2014 00:22 IST2014-05-14T00:09:23+5:302014-05-14T00:22:31+5:30
पोलिसांचे नियोजन : सेंट्रल वेअर हाऊस परिसरात होणार्या गर्दीवर नियंत्रण

लोकसभा मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
पोलिसांचे नियोजन : सेंट्रल वेअर हाऊस परिसरात होणार्या गर्दीवर नियंत्रण
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये १६ मे रोजी दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे़ यासाठी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे अंबड वेअर हाऊस परिसरात मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने तीन ठिकाणच्या वाहतूक मार्गांत बदल करण्याची अधिसूचना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी प्रसिद्ध केली आहे़
शुक्रवारी (दि़ १६) पहाटे पाच ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत किंवा निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत ग्लॅक्सो कंपनी मेनगेट- ग्राफ ाईट कंपनी- सिबल- संजीवनी बॉटनिक नर्सरीपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूने ये-जा करणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूकप्रक्रिया संबंधित वाहने वगळून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ येथील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून संजीवनीनगर- एक्स्लो कंपनी- ग्लॅक्सो कंपनी- गरवारे टी पॉईंटपासून इतरत्र जाता येणार आहे़
जी़ पी़ इलेक्ट्रॉनिक्स- महेश कंपनी- संजीवनी बॉटनिक नर्सरी- सेंट्रल वेअर हाऊस कार्पोरेशन ते एम़एस़ई़बी़ पॉवर हाऊसचे वॉलकंपाऊंडचे सुरुवातीचे टोकापर्यंत अंबड वेअरहाऊससमोरील मुख्य रस्ता, दोन्हीही बाजूने ये-जा करणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूकप्रक्रिया संबंधित वाहने वगळून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ येथील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून एम़एस़ई़बी. पॉवर हाऊस- अंबडगाव- सिडको हॉस्पिटलपासून इतरत्र जाता येणार आहे़
ओमसाई किचन कंपनी- कॉपरट्रॅक- अदिती इंडस्ट्रिज- फ ॉक्स कंपनी- प्रिंटेक्स इंजिनिअर्स- एलजय कंपनीपर्यंतचा रस्ता दोन्हीही बाजूने ये-जा करणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना (निवडणूकप्रक्रिया संबंधित वाहने वगळून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे़ येथील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून या मार्गास लागून असलेल्या अंतर्गत मार्गांचा वापर करता येणार आहे़ पोलीस सेवेतील वाहने, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा व निवडणूकप्रक्रियेसंबंधी वापरण्यात येणार्या शासकीय वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत़ (प्रतिनिधी)
--इन्फ ो--
विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची वाहन पार्किंग व्यवस्था
अ) मनसे पक्षाचे कार्यकर्ते - एम़आय़डी़सी. पोलीस चौकीशेजारील मोकळ्या जागेत़
ब) भाजपा-शिवसेना - जी़ पी़ कंपनी ते स्लाईडवेल कंपनीसमोरील रस्त्याच्या कडेने़
क) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- एस़ एस़ ई़ बी़ कंपनीच्या पॉवर हाऊससमोऱ
ड) बसपा/माकपा/अपक्ष उमेदवार/नागरिक- ओमसाई कंपनी ते अदिती इंडस्ट्रिजदरम्यान मोकळ्या जागेत़
ई) मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी शासकीय वाहने- सिबल कंपनीच्या मोकळ्या जागेत़
फ ोटो :- १३ पीएचएमए ७६-७७
वाहतूक मार्गाचा नकाशा़