शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

जयंती मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:54 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गावरील वाहतूक दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. डॉ. आंबेडकर जयंतीसाठी शहर व परिसरात जय्यत तयारी झाली आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच प्रमुख रस्ते, चौकांत लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे वातावरण निळेमय झाले आहे. यानिमित्तसामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या दिवशी शहरातून निघणारी मिरवणूक लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीवर काही निर्बंध आणले आहेत. शहरातील मिरवणुकीला भद्रकालीतील मोठा राजवाडा येथून सुरुवात होते. वाकडी बारव, कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, मंगेश मिठाई, रविवार कारंजा, रेड क्रॉस, सांगली बँक, नेहरू उद्यान, व्यापारी बँक, शालिमार, देवी मंदिरमार्गे शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप होईल. त्यामुळे मिरवणूककाळात हा संपूर्ण मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या काळात दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, सांगली बँक, सिग्नल मार्गे शालिमार व सीबीएसकडे जाणाºया शहर वाहतुकीच्या बसेस व इतर वाहने ही दिंडोरी नाका येथून पेठ फाटा सिग्नल, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौकमार्गे सिडको आणि नाशिकरोडकडे जातील. वाहतुकीचे हे निर्बंध मिरवणुकीतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागू राहणार नसल्याचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी म्हटले आहे.शहरात कडेकोट  पोलीस बंदोबस्तपरिमंडळ-१ मध्ये पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४०० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत़ यामध्ये ९ पोलीस निरीक्षक, १७ पोलीस उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १८२ पोलीस (महिला व पुरुष), १५० होमगाडर््स, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाच्या चार तुकड्या तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तास असणार आहे़४परिमंडळ-२ मध्ये पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३५० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत़ यामध्ये ६ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १५५ पोलीस (महिला व पुरुष) १५० होमगार्ड्स, ६० महिला होमगार्ड्स, दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, तर राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तास असणार आहे़ याखेरीज पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्तही तैनात असणार आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय