रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल
By नामदेव भोर | Updated: April 21, 2023 17:06 IST2023-04-21T17:06:17+5:302023-04-21T17:06:45+5:30
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी शहरातील रमजान ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यासंदर्भात अधिसुचना काढली आहे.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल
नाशिक: शहरातील त्र्यंबकरोडवर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मायको सर्कल ते त्र्यंबकरोड पोलिस चौकीपर्यंतचा रस्ता सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर येणाऱ्या वाहनांनी शनिवारी (दि.२२) सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अन्य पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन नाशिक शहर वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिसुचनेच्या माध्यमातून केले आहे.
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी शहरातील रमजान ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यासंदर्भात अधिसुचना काढली आहे. त्यानुसार त्र्यंबकरोडवर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मायको सर्कल ते त्र्यंबकरोड पोलिस चौकीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असताना मोडक सिग्नलकडून त्र्यंबककडे जाणारी वाहतूक सीबीएस अशोक स्तंभ, गंगापूर नाक सिग्नल ते जुना सीटीबी सिग्नल मार्गे जातील. किंवा मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, मुंबईनाका मार्गे जातील अथवा त्यांना जूना सीटीबी सिग्नल, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड मार्गे पुढे जाण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याचे पोलिस उपायुक्तांनी अधिसुचनेतून स्पष्ट केले आहे.
तर गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंतच्या मार्गावरही सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे चांडक सर्कलकडून गडकरी चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक चांडक सर्कल, संदीप हॉटेल, मंबईनाका मार्गे पुढे जाऊ शकणार असल्याचेही या अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.