अजंता एक्स्प्रेसच्या वेळेतील बदल रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:59 IST2020-01-11T00:02:02+5:302020-01-11T00:59:45+5:30
मनमाड येथून सुटणाऱ्या अजंता एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने हा बदल रद्द करून पूर्वीच्या वेळेतच गाडी सुटणार असल्याचे जाहीर केले आहे.

अजंता एक्स्प्रेसच्या वेळेतील बदल रद्द
मनमाड : येथून सुटणाऱ्या अजंता एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने हा बदल रद्द करून पूर्वीच्या वेळेतच गाडी सुटणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गाडी क्र मांक १७०६३ मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून रात्री ८ वाजून पन्नास मिनिटांनी सुटते. १० जानेवारीपासून या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. नवीन वेळेनुसार ही गाडी मनमाड स्थानकातून दुपारी ४ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याबाबत प्रवाशांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. असे असले तरी रेल्वे प्रशासनाने हा बदल अचानक रद्द कल्याने गाडी जुन्या वेळेनुसार प्रस्थान रवाना झाली. रेल्वे प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.