ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भाटगाव शाळेचे बदलले रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:17 IST2018-04-22T00:17:45+5:302018-04-22T00:17:45+5:30

ग्रामपंचायत आणि लोकसहभाग यांच्या सहकार्याने भाटगाव शाळेचे नवीन बदललेले रूप बघावयास मिळत असून, येवला तालुक्यापासून येवला-पाटोदा रस्त्यावर भाटगाव शाळेची स्वच्छ आणि सुंदर इमारत बघावयास मिळत आहे. संपूर्ण शाळा, सर्व वर्ग खोल्या, शाळेची संरक्षक भिंत सुंदर रंगवलेली आहे. सर्व भिंतींवर स्वच्छतेचे, पाण्याचे, शौचालयाचे महत्त्व, मुलींचे शिक्षण, वृक्षतोड या सर्व विषयांवर आधारित शाळा रेखाटलेली आहे.

Changed form of Bhatgaon school with the help of Gram Panchayat | ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भाटगाव शाळेचे बदलले रूप

ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भाटगाव शाळेचे बदलले रूप

जळगाव नेऊर : ग्रामपंचायत आणि लोकसहभाग यांच्या सहकार्याने भाटगाव शाळेचे नवीन बदललेले रूप बघावयास मिळत असून, येवला तालुक्यापासून येवला-पाटोदा रस्त्यावर भाटगाव शाळेची स्वच्छ आणि सुंदर इमारत बघावयास मिळत आहे. संपूर्ण शाळा, सर्व वर्ग खोल्या, शाळेची संरक्षक भिंत सुंदर रंगवलेली आहे. सर्व भिंतींवर स्वच्छतेचे, पाण्याचे, शौचालयाचे महत्त्व, मुलींचे शिक्षण, वृक्षतोड या सर्व विषयांवर आधारित शाळा रेखाटलेली आहे. संपूर्ण शाळा डिजिटल असून, इ.१ ते ४ वर्गात ९५ पटसंख्या आहे. गावात इंग्लिश मीडियमची शाळा असूनसुद्धा शाळेचा पट आणि उपस्थिती उल्लेखनीय आहे. शाळेचा दर्जा आणि गुणवत्ता उत्कृष्ट असून, शाळासिद्धीमध्ये शाळेला ए श्रेणी मिळाली आहे. सन २०१५ मध्ये माजी पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांच्या सहकार्याने शाळेला प्रोजेक्टर मिळाला आहे, तर शाळेत संगणक शिकविण्यासाठी शिक्षकाची नेमणूक केली आहे. मृणाल मिटके ही शाळेची माजी विद्यार्थिनी स्वखुशीने संगणकाचे ज्ञान देत आहेत. शाळेत वनभोजन, दहिहंडी, रक्षाबंधन, गणेश उत्सवातील विविध उपक्रम राबविले जातात. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अनेक तालुकास्तर आणि जिल्हास्तरीय कमिटीने शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. शाळेच्या मुख्यध्यापक शालिनी जाधव, जयश्री राठोड, धर्मंेद्र हांडे, प्रज्ञा चव्हाण ज्ञानदानाच्या कामासह शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत. शाळेसाठी माजी पंचायत समिती सभापती शिवांगी पवार, सरपंच छाया मिटके, ग्रामसेवक कृष्णा बढे आणि सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title: Changed form of Bhatgaon school with the help of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा