परिस्थितीचे भान ठेवून बदलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:20+5:302021-02-05T05:41:20+5:30

कॉलेजरोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्यावतीने ‘उद्योग विश्व २०२१’ या कार्यक्रमाचे सहावे पुष्प गुंफण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या ...

Change keeping in mind the situation | परिस्थितीचे भान ठेवून बदलावे

परिस्थितीचे भान ठेवून बदलावे

कॉलेजरोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्यावतीने ‘उद्योग विश्व २०२१’ या कार्यक्रमाचे सहावे पुष्प गुंफण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात पद्मश्री प्रतापराव जाधव, चितळे ब्रदर्सचे संचालक गिरीश चितळे, उद्योजक राज मुछाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वास्तूविशारद विवेक जायखेडकर यांना उद्योग विश्व पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. प्रतापराव पवार यांनी, पुढच्या दहा वर्षात माणसाची जागा रोबोटिक्स तंत्रज्ञान घेणार आहे. त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवून बदलावे लागणार आहे, असे सांगतले तर गिरीश चितळे यांनी , ‘कोरोनामुळे सर्वच उद्योग-व्यवसायांना प्रचंड ताण सहन करावा लागला आहे. मात्र, आता भरपूर संधी असून, त्याचा फायदा कसा करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे नमूद केले. राज मुछाळ यांनी स्वत:च्या जीवनाला आकार देण्याची ही वेळ असल्याने चिकित्सकवृत्तीने अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष योगेश राणे यांनी केले. मंडळाचे सचिन बागड, राजेश कोठावदे, दीपक बागड, चंद्रकांत धामणे, भास्कर कोठावदे, अशोक सोनजे, गाेविद देव, जगदीश कोठावदे, महेश उदावंत, संजय शिरुडे, नितीन दहीवलकर, योगेश मालपुरे, योगेश राणे यांनी दीपप्रज्वालन केले. सूत्रसंचालन सिनेअभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. तर आभारप्रदर्शन महेश पितृभक्त यांनी केले.

--

छायाचित्र आर फोटो ०३ वाणी समाज....कॉलेज रोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्यावतीने वास्तूविशारद विवेक जायखेडकर यांना उद्योग विश्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे सचिन बागड, राजेश कोठावदे, दीपक बागड, चंद्रकांत धामणे, भास्कर कोठावदे, अशोक सोनजे, गाेविद देव, जगदीश कोठावदे, महेश उदावंत, संजय शिरुडे, नितीन दहीवलकर, योगेश मालपुरे, योगेश राणे आदी.

Web Title: Change keeping in mind the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.