भारिनयमन वेळेत बदल करण्याचीमागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:02 IST2018-11-04T16:01:42+5:302018-11-04T16:02:03+5:30
सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारले

भारिनयमन वेळेत बदल करण्यासाठी औरंगपूर येथे ठिय्या आंदोलनानंतर निवेदन स्वीकारताना कनिष्ठ अभियंता सताळे व उपस्थित शेतकरी
सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी तात्काळ दाखल होऊन निवेदन स्वीकारले
वीज वितरण कंपनी ग्रामीण भागातील दर महिन्याला भारिनयम वेळेत बदल करत आहे.दि.१ नोव्हेंबर पासून पुन्हा बदल झाल्याने औरंगपूर सबस्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाº्या भेंडाळी,औरंगपूर, बागलवाडी,महाजनपुर या गावांना रात्री १०वाजून१० मिनिटांनी वीज पुरवठा सुरु केला जातो. पहाटे ६वाजता वीज पुरवठा खंडित होतो. रात्रीच वीज येते आणि रात्रीच जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. विहिरींना थोड्याफार प्रमाणात पाणी आहे शेतात पीक उभे आहे त्यांना पाणी देण्याची गरज आहे ,परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीती निर्माण झाली आहे, महाजनपुर येथे काही दिवसांपूर्वीच एका ठिकाणी पाच बिबटे पकडले आहे .अशा परिस्थितीत रात्री जागून पिकांना पाणी देता येत नाही घरातील वापराचे पाणी सकाळी भरण्याअगोदर वीजगायब होते दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.
चार दिवसांपासून शेतकºयांचा संताप असल्याने सकाळी शेतकरी जमा झाले. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यालय बाहेरून बंद करून कर्मचाºयांना कोंडून घेतले. यावेळीकनिष्ठ अभियंता साताळे दाखल झाले .शेतकरी भाऊसाहेब कमानकर, दीपक कमानकर, शरद खालकर,गोरख खालकर, मच्छिंद्र खालकर, श्याम खालकर यांनी आपले मागण्या मांडल्या,यावेळी वेळेचे नियोजन केले जाते, स्थानिक पातळीवर निर्णय घेता येत नसल्याने आम्ही कोणताही बदल करू शकत नाही. पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना कळविण्यात येईल केवळ असे आश्वासन सताळे यांनी दिल्याने शेतकº्यांचे समाधान झाले नाही. यावेळी दोन दिवसात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकर्यांनी दिला यावेळी शेतकरी उपस्थित होते