चांदवड : रविवारी आलेल्या वादळी वाºयामुळे शहर परिसरातील अनेक वीजखांब जमीनदोस्तझाले, तर वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीतकरावा, अशी मागणी शिव वाहतूक सेनेचे फिरोजभाई पठाण यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच विजेचा दाबही कमी-अधिक होत आहे. यामुळेघरातील विजेवर चालणारी उपकरणे खराब होण्याची भीती आहे. महावितरण कंपनीने त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच शहरातील बºयाच भागात लोंबकळत असणाºया वीजवाहिन्या, जीर्ण झालेले वीजखांब बदलावे, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.
चांदवडला वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:15 IST