शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

चांदवडला व्यावसायिकांवर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:27 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोना परिणाम : लग्नसराईलाही ब्रेक ; वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले

चांदवड :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.लॉकडाउनमुळे सर्वत्र उद्योगव्यवसाय मोडीत निघतील असे बोलले जात आहे. चांदवडमधील बाजारपेठ काहीअंशी उघडली असली तरी गिºहाईकच येत नसल्याची प्रतिक्रिया व्यापारी बोलून दाखवित आहेत. त्यामुळे सर्वच व्यापारी, उद्योग व्यावसायिक आर्थिक कोेंडीत सापडले आहो. कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. लॉकडाउन उठल्यानंतरही पुढे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच व्यवसाय धोक्यात आले असून, तालुक्याची अर्र्थव्यवस्था कोलमडली आहे. दररोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.आज उघडेल, उद्या उघडेल या भरवशावर दररोज नवनवीन माहिती येत असल्याने सर्वच व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शहरातील सलून, लॉण्ड्री, भांडीची दुकाने, कापड, रेडिमेड, सायकल दुकाने, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ज्वेलर्स, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, चहावाले, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक असे अनेक व्यवसाय बंद होते.हातावर पोट असलेल्यांना लॉकडाउनच्या दुसºया-तिसºया टप्प्यात दैनंदिन खर्च भागवणेही जिकिरीचे झाले होते. अनेक व्यावसायिकांना कामगार व नोकरांना घरी बसून का होईना, पगार द्यावा लागला.लॉकडाउनमुळे लग्नसराई गेली. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेल्या घटकाचे नुकसान झाले. फोटोग्राफर,बॅण्डपथकातील वादक यांना उपासमारीची वेळ आली आहे. आठवड्याच्या बाजारावर अनेक जण आपला चरित्रार्थ चालवितात मात्र तोच बंद असल्याने तो कधी सुरु होईल अशी चिंता अनेक बाजारकरु व्यापाऱ्यांना लागली आहे. चांदवड शहरातील टॅक्सी, रिक्षा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे पुढील काळात पोटपाणी कसे भागणार का असा प्रश्न टॅक्सी, रिक्षाचालकांना सतावत आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी भाजीपाला, फळेविक्रीचा नव्याने व्यवसाय सुरु केला.प्रशासनाच्या वतीने एका जागी बसून माल विक्री करता येत नाही तर घरपोहच व्यवसाय करुन तो किती यशस्वी झाला, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. माल पडून राहणे, भाजीपाला पडणे, अशा अडचणी असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांंिगतले. एकंदरीत सर्वच व्यापारी हवालदिल झाले असून, कोरोना लवकरात लवकर संपो सर्व काही सुरळीत होवो अशी अपेक्षा व्यापारीवर्गाने बोलून दाखविली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय