चांदवड तालुका शिक्षक भारती कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:31+5:302021-09-21T04:15:31+5:30
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आयोजित शिक्षक भारती सहविचार सभा व चांदवड तालुका कार्यकारिणी ...

चांदवड तालुका शिक्षक भारती कार्यकारिणी जाहीर
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आयोजित शिक्षक भारती सहविचार सभा व चांदवड तालुका कार्यकारिणी पदभार नियुक्ती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत हाेते. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे होते. या सभेला शिक्षक भारती राज्य सरचिटणीस भरत शेलार, कार्यवाह विनायक लाड, जिल्हा सरचिटणीस शरद शेलार, नगरसेवक भगुर संग्राम करंजकर, जिल्हा पदाधिकारी बी. वाय. शिंदे, माजी उपसभापती यु. के. आहेर, जिल्हा पदाधिकारी चंद्रशेखर शेलार, नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफणा आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे यांनी शिक्षक भारती चांदवड तालुका कार्यकारिणी घोषित करून तालुकाध्यक्ष म्हणून गोरख शिवहार डघळे यांची, तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून यु. के. आहेर यांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली. शिक्षक भारतीचे नूतन अध्यक्ष जी. एस. डघळे यांनी सूत्रसंचालन केले. एस. डी. शिंदे यांनी आभार मानले. कार्यकारिणीत उपाध्यक्ष - बाळू महिफतपवार (खडक ओझर), महिला उपाध्यक्ष - मंजुषा ओस्तवाल (चांदवड), सचिव - काशिनाथ अहिरे (चांदवड), सहसचिव - अशोक सोमवंशी (खडकओझर), मार्गदर्शक - भागवत मांदळे (भाटगाव), कार्याध्यक्ष - योगेश वाघ (राजदेरवाडी), सहकार्याध्यक्ष - तानाजी कदम (पाथरशेंबे), कार्यवाह - हरिभाऊ मंडलिक (दुगाव), सहकार्यवाह - समाधान बिडगर (सुतारखेडे), कोषाध्यक्ष- सूर्यभान मापारी (वाकी), सल्लागार- कैलास सोनवणे (चांदवड), प्रसिद्धीप्रमुख- धनंजय काळे (परसूल), महिला प्रतिनिधी- वंदना महालकर (दुगाव), सुनील काकडे (राहुड), सदस्य - किशोर शिंदे (गणूर), दत्ता निकम (आडगाव), दिगंबर देवढे (वाकी), विजय खैरनार (वाहेगावसाळ), माणिक गांगुर्डे (राहुड) यांची निवड करण्यात आली.