चांदवडला आजपासून कांदा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:28 IST2020-05-18T21:33:30+5:302020-05-19T00:28:39+5:30
नाशिक : जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत मंगळवारपासून (दि.19) नियमित कांदा लिलाव सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांनी लिलाव झाल्यानंतर कांदा भरण्यासाठी पाटी, घमेलेसोबत आणावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे

चांदवडला आजपासून कांदा लिलाव
नाशिक : जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत मंगळवारपासून (दि.19) नियमित कांदा लिलाव सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांनी लिलाव झाल्यानंतर कांदा भरण्यासाठी पाटी, घमेलेसोबत आणावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे
मंगळवारपासून कांदा लिलाव सुरु राहातील. कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कांदा मोकळ्या स्वरूपात निवड व प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे कळविण्यात आले आहे.
लिलावासाठी शेतकरी बांधवांनी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये, ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतर (सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत) आवारात यावे. रात्री मुक्कामी येणाºया वाहनांना आवारात प्रवेश दिला जाणार नाही, एका दिवसात ४०० ते ५०० वाहनांतील मालाचा लिलाव केला जाणार आहे, असे बाजार समितीतर्फे कळविण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी बाजार समितीत आल्यानंतर आपापल्या वाहनाजवळच थांबावे, तसेच एका वाहनाबरोबर एकाच व्यक्तीने यावे. लिलावाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये. ज्या वाहनाचा लिलाव सुरू असेल त्या शेतकºयानेच वाहनाजवळ थांबावे. गर्दी करू नये किंवा समूह करून बसू नये. प्रत्येक शेतकºयाने आपल्यात किमान ५ ते १० फुट अंतर ठेवून ट्रॅक्टर लावावे. तसेच आवारात येण्यापूर्वी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून यावे. आवारात आल्यानंतर कुठेही थुंकू नये. धूम्रपान करु नये. आजारी शेतकऱ्यांनी येऊ नये, बाजार समितीचे आवारावर शेतकरी बांधव व बाजार घटकांसाठी हात, पाय स्वच्छ धुण्याची व्यवस्था केलेली असून, ठिकठिकाणी ३० ते ४० लिटरचे पाण्याने भरलेले ड्रम व त्यासोबत साबण ठेवण्यात आली आहे. त्याचा दैनंदिन व वेळोवेळी वापर करावा. बाजार समितीचे मुख्य गेटवर निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून आवारात येणाºया सर्व घटकांनी त्याचा नियमित वापर करावा. सर्व बाजारघटकांनी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाºया सूचनांचे स्वंयस्फूर्तीने काटेकोर पालन करावे व बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.