चांदवडला नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:02 IST2020-04-28T20:42:37+5:302020-04-28T23:02:43+5:30
चांदवड : राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतमधील सफाई कामगार व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीवन विमा उतरविण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ एप्रिल २० रोजी चांदवड नगर परिषदेत काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. व नित्यनियमाप्रमाणे कामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली.

चांदवडला नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज
चांदवड : राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतमधील सफाई कामगार व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीवन विमा उतरविण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ एप्रिल २० रोजी चांदवड नगर परिषदेत काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. व नित्यनियमाप्रमाणे कामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली.
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी संपूर्ण राज्यातील नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी व कर्मचारी काम करत राहणारच आहेत. यावेळी हर्षदा राजपूत, शेषराव चौधरी, अनिल कुरे, सत्यवान गायकवाड, सोमनाथ देवकाते, ब्रजेशकुमार सिंग, संगणक अभियंता तुषार बागुल, कर निरीक्षक पवन कस्तुरे, ललित जाधव, राजेंद्र बेलदार, शैलेश पवार, संजय गुरव, संदीप कोतवाल, मुफिज शेख, संदीप महाले, अमोल आहेर, महेंद्र कांदळकर, यशवंत बनकर, संजय बरकले, मच्छिंद्र जाधव, श्रावण कापसे उपस्थित होते.