चांदवडला वीज जोडणी बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:53+5:302021-09-07T04:17:53+5:30
नांदगावी मशिनरी बसविण्यात आली असून, उर्वरित प्लांटचे काम सुरू आहे. हा प्रकल्पदेखील लवकरच सुरू होत आहे. तर चांदवड येथील ...

चांदवडला वीज जोडणी बाकी
नांदगावी मशिनरी बसविण्यात आली असून, उर्वरित प्लांटचे काम सुरू आहे. हा प्रकल्पदेखील लवकरच सुरू होत आहे. तर चांदवड येथील मशिनरी उभारल्यानंतर वीज जोडणीचे काम बाकी होते. ते पूर्ण झाले. त्यामुळे ८/१० दिवसांत प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सिन्नरला काम पूर्ण झाले असून, त्याची टेस्टिंग घेतली जात आहे.
निफाड तालुक्यात निफाड व पिंपळगाव बसवंत येथे ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट उभारण्यात आले असून, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २/४ दिवसांत या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे समजते.
इन्फो
तालुका : कामाची स्थिती
त्र्यंबकेश्वर : अद्याप काहीच हालचाल नाही.
हरसूल : केवळ वीज जोडणी शिल्लक.
देवळा : काम अंतिम टप्यात, लवकरच लोकार्पण.
येवला : यापूर्वीच लोकार्पण झाले.
कळवण : काम अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात लोकार्पण.
सुरगाणा : काम पूर्ण, पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होईल.
इगतपुरी : दोन दिवसांपूर्वीच लोकार्पण झाले.
पेठ : टेंडर पण निघाले नाही, काहीच हालचाल नाही.
नांदगाव : मशिनरी बसविण्याचे काम सुरू.
चांदवड : काम पूर्ण, लवकरच होणार कार्यान्वित.
मालेगाव : यापूर्वीच झाले लोकार्पण.
सिन्नर : काम झाले पूर्ण.
निफाड : काम पूर्ण, टेस्टिंग चालू आहे.
सटाणा : मशिनरी पण नाही. काम ठप्प आहे.
दिंडोरी : प्लांट पेठ तालुक्यात स्थलांतरित.
(०४ चांदवड,१)