चांदवड : अण्णा भाऊ साठे, टिळक यांना अभिवादन

By Admin | Updated: August 2, 2016 01:09 IST2016-08-02T01:08:10+5:302016-08-02T01:09:03+5:30

चांदवड : अण्णा भाऊ साठे, टिळक यांना अभिवादन

Chandwad: Greetings to Anna Bhau Sathe, Tilak | चांदवड : अण्णा भाऊ साठे, टिळक यांना अभिवादन

चांदवड : अण्णा भाऊ साठे, टिळक यांना अभिवादन

 चांदवड : येथील श्रीमती जे.आर. गुंजाळ विद्यालयात प्राचार्य वाय.एन. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ शिक्षक हरिभाऊ ठाकरे, आर.के. शेळके, एस.पी. पाटील, एस.ए. सोनवणे, एस.जी. पाटील, सुभाष ठाकरे, पोमणार, सुखदेव हांडगे, नागेश गायकवाड, एस.बी. चव्हाण, साहेबराव ठाकरे यांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही नेत्याबाबत विद्यार्थी, शिक्षकांची भाषणे झालीत. प्रास्ताविक एम.पी. कुंभार्डे यांनी केले.
यावेळी पी.डी. अहेर, कापडणे, एस. एल. खुटे, सौ. चव्हाण, श्रीमती रौंदळ, श्रीमती पाटील, श्रीमती देवरे, श्रीमती केदारे, श्रीमती अनवट, श्रीमती बच्छाव, श्रीमती गावले आदिंसह शिक्षक उपस्थित होते, तर आभार एस. बी. चव्हाण यांनी मानले.
चांदवड अध्यापक विद्यालय : येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित लीलाबाई दलुभाऊ जैन अध्यापक विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य संगीता बाफना होत्या. यावेळी विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रा. सोपान काजळे, प्रा. धनंजय मोरे, प्रा. समाधान जगताप, प्रा. सुप्रिया सोनवणे, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
चांदवड अभिनव बालविकास मंदिर : येथील मविप्र समाज अभिनव बालविकास मंदिरात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक ए.पी. साळुंके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. श्रीमती सीमा जाधव व श्रीमती सुरेखा अहेर यांनी दोन्ही नेत्याचा जीवनपट सांगितला तर वर्गवार वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात कु. मृण्मयी कासव, दीप्ती दिवटे, आरूषी मोरे, अनुष्का गांगुर्डे, अनमोल बनकर, प्रणव कोल्हे, यज्ञेश धाकराव, सार्थक ठाकरे, पूनम पंडित, खुशी संत, निखिल देवरे, सिद्धी जाधव, प्रतीक्षा पवार, अफशा शेख, साक्षी कोल्हे, जान्हवी सोनवणे, साक्षी संत, रिद्धी कोकणे, यश जाधव, निर्जला जाधव, प्रतीक्षा निकम, या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर क्षितिज पवार याने टिळकांची वेशभूषा केली होती. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास श्रीमती सोनाली सूर्यवंशी, महेश रकिबे, संगीता शिर्के, सीमा जाधव, मनीषा गवळी, योगीता चव्हाण, चंद्रशेखर गवळी, कल्याण ठाकरे, अनिल जाधव, जयश्री गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Chandwad: Greetings to Anna Bhau Sathe, Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.