चांदवड परिसरात वादळ व वा:यामुळे झाडे पडली ; वीजपुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 16:41 IST2021-05-17T16:41:04+5:302021-05-17T16:41:44+5:30
चांदवड - चांदवड शहर व परिसरात तसेच तालुक्यात काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर मध्यरात्रीनंतर मोठय़ा प्रमाणात वादळ झाल्याने अनेक घराचे पत्रे उडाले तर परिसरातील झाडे पडली आहेत. या वादळामुळे शेतकरी व परिसरातील नागरीकांचे मोठे नुकसान झाले.

चांदवड परिसरात वादळ व वा:यामुळे झाडे पडली ; वीजपुरवठा खंडीत
चांदवड - चांदवड शहर व परिसरात तसेच तालुक्यात काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर मध्यरात्रीनंतर मोठय़ा प्रमाणात वादळ झाल्याने अनेक घराचे पत्रे उडाले तर परिसरातील झाडे पडली आहेत. या वादळामुळे शेतकरी व परिसरातील नागरीकांचे मोठे नुकसान झाले.
शेतातील पिकाची नुकसान झाली आहे. तर चांदवड येथील श्रीराम रोडवर रंगमहाल भिंतीजवळ वीजेच्या तारावर झाड पडल्याने मध्यरात्नीपासून वीजपुरवठा खंडीत होता तर ज्ञानेश्वर व्यवहारे यांच्या मालकीच्या एका मारूती व्हॅन वर झाड पडले मात्न सुदैवाने व्हॅनचे मोठे नुकसान झाले नाही.
वीज वितरण कंपनीचे ठेकेदार पंकज राऊत व नगर परिषद कर्मचारी यांच्या चमुने अवघ्या पंधरा मिनीटात खोळंबलेली वाहतुक अद्यावत मशिनने झाड तोडून मोकळी केली .व अथक परिश्रमाने संध्याकाळ र्पयत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते.