शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

चांदवड अपघात : ‘१०८’च्या सहा रुग्णवाहिकांची आपत्कालीन धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:14 PM

चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली.

ठळक मुद्देएकापाठोपाठ रुग्णवाहिका घटनास्थळी डॉक्टरांच्या चमुसह दाखल नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक : येथील सोग्रस शिवरात महामार्गावर भाविक पर्यटकांची मिनी बस महामार्गालगत उभ्या असलेल्या नादुरूस्त वाळूच्या ट्रकवर पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा पुरविणाऱ्या ‘१०८’ च्या एकूण सहा रुग्णवाहिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहचविले.चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. अपघाताचे स्वरुप व जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती या रुग्णवाहिकेने कळविताच जवळील १०८च्या सेवा देणा-या पिंपळगाव, उमराणे, सौंदाणे, देवळा, मनमाड या ठिकाणाहूनही रुग्णवाहिका तत्काळ पाठविण्यात आल्या. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरात एकापाठोपाठ रुग्णवाहिका घटनास्थळी डॉक्टरांच्या चमुसह दाखल झाल्याने सुमारे पंधरा ते वीस जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालय व नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविणे शक्य झाले. जखमींची व मृतांची संख्या अधिक असल्यामुळे ‘१०८’च्या रुग्णवाहिकांना  महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका व अन्य काही खासगी संस्थांच्या रुग्णवाहिकांनीही मदत केली. एकूणच रुग्णवाहिका मोठ्या संख्येने वेळेत दाखल झाल्याने जखमींना पुढील उपचार वेळेवर मिळाले.घटनास्थळावरुन चांदवड, पिंपळगाव, उमराणे, सौंदाणे, देवळा, मनमाड या प्रत्येकी एक रुग्णवाहिके ने एकूण सहा ते सात रु ग्ण उपजिल्हा रुग्णालयात हलविले. प्रथोमोपचारानंतर पुढील उपचारासाठी चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयातून सकाळी ‘१०८’ च्या रुग्णवाहिकांमधून ११ रुग्णांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ.अश्विन राघमवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ८ रुग्णांवर उपचार सुरू असून सहा रुग्ण आपत्कालीन कक्षात तर दोन अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. उर्वरित सहा रुग्णांना मुंबईनाका येथील सुयश या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अजून दोन जखमी रुग्ण या खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणे