चांदवडला स्वयंसेवक संघाचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 17:46 IST2018-10-18T17:44:31+5:302018-10-18T17:46:13+5:30
चांदवड येथे स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त पथसंचलन करण्यात आले.

चांदवडला स्वयंसेवक संघाचे संचलन
संचलन रंगमहालापासून निघून शिपाटगल्ली, वरचेगाव, श्रीरामारोड, शिवाजी चौक, सोमवारपेठ, लोहारगल्ली या मार्गे करण्यात आले. गाडगेबाबा पटागंण येथे संचलनाचा समारोप करण्यात आला. संचलनात घोड्यावर दंडधारी व स्वयंसेवक सहभागी झाले होत. या संचलनात आमदार डॉ. राहुल अहेर हे सुध्दा संघाचा पोशाख परिधान करुन सहभागी झाले होते. यावेळी ठिकठिकाणी पुष्पवर्षाव व फटाक्यांची आतषबाजी करीत संचलनाचे स्वागत करण्यात आले. दरवर्षापेक्षा यंदा स्वंयसेवकांची गर्दी लक्षणीय होती. तर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, अनिल केदारे, मंगेश डोंगरे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.