शनिवारपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता

By Admin | Updated: June 26, 2014 01:16 IST2014-06-26T01:13:23+5:302014-06-26T01:16:23+5:30

शनिवारपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता

Chances of getting the hike from Saturday | शनिवारपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता

शनिवारपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता

 

नाशिकरोड : रेल्वे प्रवास भाडेवाढ ही फक्त आरक्षण तिकिटाकरिताच मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. साधारण रेल्वे तिकिटाकरिता ही भाडेवाढ अंमलात आलेली नसून शनिवारी भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व वस्तूच्या वाहतुकीचे दर ६.५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेऊन ही दरवाढ मंगळवारच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी भाड्यात केलेला भाडेवाढीचा ‘प्रोग्राम’ हा फक्त तिकीट आरक्षण कार्यालयातीलच संगणकामध्ये दाखल झाला आहे. यामुळे मध्यरात्रीपासून आरक्षण तिकिटामध्ये भाववाढ झाली आहे. मात्र भाववाढीचा प्रोग्राम साधारण तिकीट (आरक्षण नसलेले) कार्यालयातील संगणकामध्ये दाखल झाला नाही. त्यामुळे साधारण तिकीट हे अद्याप जुन्या दरानेच मिळत आहे. मात्र येत्या शनिवारपर्यंत रेल्वे प्रवासी दरवाढ ही साधारण तिकिटांमध्येदेखील लागू केली जाईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. ज्या प्रवाशांनी २५ जूनपूर्वी आरक्षण तिकीट काढले आहे मात्र ते दरवाढीनंतर प्रवास करणार असल्याने प्रवाशांना दरवाढीचा फरक आरक्षण किंवा टीटीईकडे जमा करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
पोलीस निलंबित
नाशिक : अंबड लिंकरोडवरील भंगारच्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिक व दुकानमालकाने पकडले असता त्यास सोडून द्या, असे सांगणारा पोलीस कर्मचारी विजय म्हैसधुणे यास आयुक्तांनी निलंबित केले़ अंबड लिंकरोडवरील नूर ट्रेडर्स या दुकानात चोरी करताना संशयित मुन्नाकुमार उमेशप्रसाद व जोहरद अली या दोघांना पकडण्यात आले होते़ दुकानमालकाने अंबड पोलिसांना ही बाब कळविली असता त्यांना म्हैसधुणे या पोलीसाने चोरट्यास सोडून देण्यास सांगितले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Chances of getting the hike from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.