सटाण्यात झोक्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

By Admin | Updated: January 28, 2017 01:01 IST2017-01-28T01:00:59+5:302017-01-28T01:01:15+5:30

सटाण्यात झोक्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

Chameleon death due to falling from the stairs | सटाण्यात झोक्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

सटाण्यात झोक्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

 सटाणा : लक्ष्मणवाडी परिसरातील शेतात झोक्यावरून पडून अडीच वर्षीय चिमुरडीचा अंत झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष विजय दादाजी सोनवणे हे अजमिर सौंदाणे रोडवरील लक्ष्मणवाडी परिसरात वास्तव्याला आहेत. त्यांची एकुलती एक कन्या लक्ष्मी ही झोका घेत असताना तोल गेल्याने खाली कोसळली. तिच्या फुफ्फुसाला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर येथील खासगी रु ग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. (वार्ताहर)

Web Title: Chameleon death due to falling from the stairs