पंचवटी : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेले दोघे १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी डोंगराच्या मध्यभागी अडकल्याची घटना मंगळवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. चामरलेणी डोंगरावर भरकटलेले ट्रेकर्स अडकल्याची माहिती म्हसरूळ पोलीस मदतीला धावले आणि पोलिसांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवून दोघा ट्रेकला सुखरूप खाली उतरविले तब्बल दीड तास रेस्क्यू आॅपरेशन सुरू होते.दत्तनगर येथे राहणारा चेतन जाधव (वय १९) व त्याचा मित्र प्रतीक देवरे (वय १९ रा. राममंदिर परिसर) असे दोघेही भोसला महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅडेट आहे. चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले असता ते भरकटले व अर्ध्या रस्त्यातच अडकले त्याचवेळी चामरलेणी डोंगराच्या पायथ्याशी वायरलेस गार्ड असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेकर अडकल्याची माहिती मिळाली.त्यावेळी पोलिसांनी रेस्क्यू आॅपरेशन मोहीम राबविली पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले व पोलीस शिपाई सुनील चव्हाण, असे दोघेही मोठ्या हिमतीने डोंगरावर दोरखंडाच्या सहाय्याने चढले अर्ध्या डोंगरावर अडकलेल्या दोघांनाही तब्बल दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर सुखरूप खाली उतरविण्यात आले.ट्रेकरने आरडाओरड केल्याने सायंकाळी परिसरात फिरणाºया नागरिकांचे लक्ष वेधले गेले त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ सदरची घटना नियंत्रण कक्षाला कळविली. पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्यासह पोलीस पथक, अग्निशामक आणि अति शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
चामरलेणीत भरकटले दोघे ट्रेकर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:25 IST