चेंबरचे पाणी रस्त्यावर
By Admin | Updated: May 30, 2014 01:07 IST2014-05-29T23:31:47+5:302014-05-30T01:07:14+5:30
दुर्गंधी पसरली : प्रशासन अनभिज्ञ

चेंबरचे पाणी रस्त्यावर
दुर्गंधी पसरली : प्रशासन अनभिज्ञ
पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मधील शक्तीनगर येथिल शांतीदया सोसायटीच्या समोर गेल्या पंधरवाडयापासून चेंबरचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. विशेष म्हणजे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
याभागात महापालिकेचे सफाई कामगार रोजच येतात मात्र त्यांच्याही निदर्शनास चेंबरमधून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी दिसत नसल्याने प्रशासन अनभिज्ञ आहे असा आरोप नागरीकांनी केला आहे. ज्याठिकाणी चेंबर तुंबलेले आहे तेथून दिवसभर दुर्गंधीचे पाणी वाहते व ते जवळच्या इमारतीच्या समोर असलेल्या व्यवसायिकांच्या दुकानासमोर येत असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. चेंबरमधून वाहणार्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असुन सध्या नागरीकांना येजा करतांना नाकातोंडावर रुमाल ठेवूनच जावे लागत आहे. प्रशासनाने ज्याठिकाणी चेंबर फुटले आहे त्याठिकाणी तत्काळ दुरूस्ती करावी तसेच ज्या घरमालकाचे चेंबर तुंबले आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)