शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

चामरलेणी : पिस्तुलचा धाक दाखवून जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 2:54 PM

हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले

ठळक मुद्देसोन्याच्या दागिन्यांसह पाच मोबाईलवर डल्ला

नाशिक :  म्हसरूळ शिवारातील चामारलेणी येथे फिरण्यासाठी गेलेल्या पंचवटीतील चौघा युवकांना चौघा संशयित आरोपींना बेदम मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवून त्यातील पाच आयफोन तसेच अंगावरील साडे पाच तोळ्याचे दागिने असा जवळपास २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतल्याची घटना घडली. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या जबरी चोरीप्रकरणी पंचवटीतील विजयनगर कॉलनी येथे राहणाऱ्या ब्रज अक्षय शहा याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ब्रज शहा मित्र मित माजेठिया आणि सिद्धांत शर्मा असे पेठरोडवर चांभार लेणी येथे फिरण्यासाठी गेले होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मित्र चामारलेणी पायथ्याशी लोखंडी शेड जवळ फोटो काढत असताना उंचीने कमी असलेला गळ्यात हस्तीदंतासारखे ताईत घातलेला एक संशयित आला व त्याने पिस्तूल दाखविले. त्यानंतर त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने शहा आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ मारहाण करत शहा व त्याच्या मित्रांच्या अंगावरील हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले तर घटना घडल्यानंतर घाबरलेल्या युवकांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हा शाखेच्या पोलिसांना आदेश दिले आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरी