ज्ञानगंगा कायम प्रवाहित ठेवण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:55+5:302021-09-06T04:18:55+5:30
बिघडली होती. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी आता शाळांनाच द्यायला हवी आणि शाळा सुरू करायला ...

ज्ञानगंगा कायम प्रवाहित ठेवण्याचे आव्हान
बिघडली होती. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी आता शाळांनाच द्यायला हवी आणि शाळा सुरू करायला हव्यात, अशी मागणी आता विविध शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून होत आहे. यामागे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना निश्चितच आहे. परंतु, संगणकातून अवतरलेला हा डिजिटल शिक्षणाचा प्रवाह शाळा, शिक्षक आणि शिक्षक संघटनांना नामशेष करणार की काय? अशी भीती या मागे नाही असेही म्हणता येणार नाही. परंतु, यात कोणीही भीती बाळगण्याचे कारण निश्चितच नाही, कारण
संगणकाला बरे-वाईट समजत नाही, ते शिक्षकांना समजते. त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षकी पेशा केवळ नोकरी नाही, तर समाज घडविण्याची जबाबदारी असल्याचे समजून घेत ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवण्याचे आव्हान गुरुजनांना पेलावे लागणार आहे.
कोरोना संकटाने संपूर्ण जगाला घरात कोंडल्याचे भीषण दृश्य गेल्या काही दिवसांत अनुभवायला मिळाले. भारतासारख्या विकसनशील देशात तर अपुऱ्या सोयीसुविधांअभावी अशा परिस्थितीत दैनंदिन व्यवहार, दळण-वळण, शाळा, शिक्षण कसे चालणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. परंतु, संगणकाने यापूर्वीच घडवून आणलेली डिजिटल क्रांती ऑनलाईन तंत्रज्ञानाने याच काळात घराघरांत पोहोचवली.
त्यामुळेच घरातील आई-बाबा आणि अंगणवाडीतील शिक्षिकांऐवजी पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बोबड्या बोलांचा आधारही त्यांच्या हातात आलेला मोबाईल आणि त्यातून दिसणारे कार्टून बनले असे काहीसे चित्र अवतीभवती दिसत नसेल तरच नवल. मुलांचा वाढता वयोगट आणखीनच या प्रवाहात सामावल्याचे ओळखून वेगवेगळ्या मोबाईल ॲप कंपन्यांनी ऑनलाईन माध्यमातून काॅर्पोरेट एज्युकेशन प्रणाली विकसित करून छोट्या मोठ्या शिकवणी चालकांचे शटर डाऊन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल येणाऱ्या काळात शाळा, महाविद्यालयांच्या दिशेने पडणारच नाही, असे नाही. ते रोखण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ माहिती इंटरनेट, मोबाईलच्या साहाय्याने कुठेही आणि केव्हाही मिळू शकते. परंतु, त्यातील सामाजिक व भावनिक बरे-वाईट दृष्टिकोन पडताळण्याचे कसब हे शिक्षकच देऊ शकतात, त्याच दिशने मार्गक्रमण करीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढे येऊन काम करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
- नामदेव भोर