शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कामगार सेनेचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 2:45 PM

संघटना मान्यताप्राप्तच : नागरी सेवा अधिनियम लागू नाही

ठळक मुद्देमहापालिकेतील कर्मचाऱ्यांना महाराष्ट नागरी सेवा अधिनियम लागू असल्याचे सांगत मान्यता नसलेल्या संघटनेच्या पदाधिका-यांशी चर्चा करण्यास नकार म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना ही श्रमिक संघ अधिनियम-१९२६ अन्यवे मान्यता प्राप्त

नाशिक - महापालिकेतील कर्मचाऱ्यांना महाराष्ट नागरी सेवा अधिनियम लागू असल्याचे सांगत मान्यता नसलेल्या संघटनेच्या पदाधिका-यांशी चर्चा करण्यास नकार देणा-या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आव्हान दिले आहे. मनपाच्या कर्मचा-यांना महाराष्ट्र अधिनियम नागरी सेवा अधिनियम लागू नसून म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही श्रमिक संघ अधिनियमांतर्गत मान्यताप्राप्त असल्याचे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे पत्रच संघटनेने सादर केले आहे.फेबु्रवारी २०१८ मध्ये महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त लावण्याच्या दृष्टीने कर्तव्यात कसूर करणा-या कर्मचारी-कामगारांवर कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही एकमेव मान्यताप्राप्त संघटना आहे. सदर संघटनेचे पदाधिकारी आयुक्तांकडे चर्चेस गेले असता, महापालिका कर्मचा-यांना नागरी सेवा अधिनियम लागू असून त्याअंतर्गत सामान्य प्रशासन विभागाची मान्यता नसल्याने तुमची संघटना मान्यताप्राप्त नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी चर्चा करण्यास नकार दिला होता. त्यामुळे, म्युनिसिपल कर्मचारी-कामगार संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी संघटनेच्या मान्यतेविषयी शंका उपस्थित झाल्याने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून त्याबाबतची माहिती मागविली होत. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दि. प्र. देशमुख यांनी अध्यक्षांना पत्र पाठवित खुुलासा केला आहे. पत्रात म्हटले आहे, म्युनिसिपल कर्मचारी-कामगार संघटना ही महापालिकेतील कामगारांची संघटना आहे. महापालिकेच्या कर्मचा-यांना महाराष्ट नागरी सेवा अधिनियम लागू होत नाही. महापालिकेचे कर्मचारी हे महाराष्ट महापलिका अधिनियमांतर्गत येतात व त्यांना कामगार कायदे लागू होतात. त्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना ही श्रमिक संघ अधिनियम-१९२६ अन्यवे मान्यता प्राप्त असल्याचे दिसून येते. सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम २९ व ३० नुसार फक्त शासकीय औद्योगिकेतर कर्मचा-यांच्या संघटनांना मान्यता देत असल्याचेही म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागानेच खुलासा करत संघटना मान्यताप्राप्त असल्याचे स्पष्ट केल्याने आता आयुक्तांविरोधी कामगार संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आयुक्तांना पत्र सादर करुआयुक्तांनी महापालिका कर्मचारी हे महाराष्ट नागरी सेवा अधिनियमात येत असल्याचे सांगत सामान्य प्रशासन विभागाची संघटनेला मान्यता नसल्याने बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे, आम्ही संघटना पातळीवर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मान्यतेबाबतची माहिती मागविली होती. सदर पत्र प्राप्त झाले असून त्यात संघटना मान्यताप्राप्त असल्याचे आणि मनपा कर्मचा-यांना नागरी सेवा अधिनियम लागू होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयुक्तांना आम्ही आता हे पत्र सादर करु.- प्रविण तिदमे, अध्यक्ष,मनपा कामगार सेना

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे