शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या निर्बंधांना न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:36 IST

शहरातील आर्टिलरी सेंटरपासून सुमारे पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नसल्याच्या कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या आहेत. मिळकतधारकांच्या मते आर्टिलरी सेंटरच्या परिसरात कोणतेही निर्बंध लागू नाहीत, तर मनपाच्या मते २०११ पूर्वीच्या आदेशाने निर्बंध कायम असल्याच्या दाव्यामुळे हा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्दे कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरणशेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या वर्क आॅफ डिफेन्स अ‍ॅक्टनुसार मिळकतधारकांना भरपाई मिळावी

संजय पाठक।नाशिक : शहरातील आर्टिलरी सेंटरपासून सुमारे पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नसल्याच्या कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या आहेत. मिळकतधारकांच्या मते आर्टिलरी सेंटरच्या परिसरात कोणतेही निर्बंध लागू नाहीत, तर मनपाच्या मते २०११ पूर्वीच्या आदेशाने निर्बंध कायम असल्याच्या दाव्यामुळे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, लष्करी हद्दीलगत मुळातच निर्बंध लागू होत नाहीत आणि लागू होत असतील तर वर्क आॅफ डिफेन्स अ‍ॅक्टनुसार मिळकतधारकांना भरपाई मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  गेल्या काही महिन्यांपासून हा घोळ कायम आहे. संरक्षण खात्याने देशभरातील लष्करी आस्थापनांच्या परिसरात खासगी बांधकामांना निर्बंधांबाबत २०११ मध्ये एक पत्रक जारी केले होते. त्यात लष्करी हद्दीपासून शंभर मीटर क्षेत्राच्या आत कोणतेही बांधकाम करायचे असेल तर त्यावर निर्बंध असतील.  त्यासाठी प्राधिकृत यंत्रणेने परवानगी देताना संरक्षण खात्याच्या संबंधित क्षेत्रातील अधिकाºयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, तर शंभर ते पाचशे मीटर क्षेत्रात बांधकाम होत असताना ते बांधकाम संरक्षण खात्याच्या दृष्टीने धोकादायक असेल तर लष्करी अधिकाºयांनी कमांडंटला कळवायचे, त्यांनी महापालिका आयुक्तांना कळवून हे बांधकाम रोखावे आणि त्यानंतरही आयुक्तांनी कारवाई न केल्यास आयुक्तांबाबत संरक्षण खात्याला कळवावे असे नमूद असून, या आदेशात सरसकट कुठेही बांधकामाला परवानगी नाकारलेली नाही. या पत्रामुळे गोंधळ झाल्यानंतर अनेक खासदारांनी संरक्षण खात्याकडे आक्षेप घेतले.  १ २०१६ मध्येदेखील संरक्षण खात्याने नवे पत्रक जारी केले. त्यात अनेक खासदारांच्या आक्षेपाचा संदर्भ दिला होता आणि निर्बंधाचे निराकारण करण्यासाठी लष्कराच्या आस्थापना असलेल्या दोन याद्या तयार केल्या. त्यातील पहिल्या यादीत १४५ ठिकाणांचा समावेश असून, त्यात लष्करी आस्थापनेपासून ५० मीटर क्षेत्रात बांधकाम निषिद्ध ठरविण्यात आले, तर उर्वरित ठिकाणी बांधकाम करता येईल, असे नमूद आहे.  दुसºया यादीत १९३ ठिकाणांचा समावेश असून, त्यात लष्करी हद्दीपासून १० मीटर अंतरानंतर बांधकाम करता येईल असे नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणच्या यादीत नाशिक शहराचा समावेश नसल्याने नाशिकला कोणतेही निर्बंध नाहीत असे विकासकांचे म्हणणे आहे. परंतु महापालिकेच्या नगररचना खात्याचे अधिकारी हे मान्य करीत नसून २०११ पूर्वी असलेले निर्बंध कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.बांधकाम परवानग्या रखडल्या नाशिक महापालिका सुधारित आदेश जुमानत नसल्याने आर्टिलरीच्या परिघातील बांधकामांच्या परवानग्यांसाठी प्रशासन प्रस्ताव लष्करी अधिकाºयांकडे पाठवित असून, त्यांच्याकडून ना हरकत दाखल्यांची प्रतीक्षा आहे. परंतु अशा प्रकारचे दाखले आर्टिलरी सेंटरचे अधिकारी देत नसल्याने बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाairforceहवाईदल